पुणे दिनांक २० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पून्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे.दरम्यान त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक समर्थक हे मोठ्या संख्येने येत आहे. त्यातच उद्या दिनांक २१ सप्टेंबर शनिवारी संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.दरम्यान ही हाक अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.तसेच यावेळी बंद शांततेत पाळावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.दरम्यान जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.