पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत.त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आज शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.दरम्यान तशी माहिती मराठा समाजाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे व हैद्राबाद.मुंबई.आणि सातारा ही तिन्ही गॅझेट तातडीने लागू करण्यात यावी.तसेच महाराष्ट्रात मराठा समाजाच्या युवकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे.अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारकडे केली आहे.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे.त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज लाखोंच्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाला आहे.