पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुतनीकृत पुणे लोहगाव विमानतळाचे नामकरण करण्यास महायुती मंत्रीमंडळाकडून मंजुरी दिली जाईल असं जाहीर केलं.आता पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नाव थोड्याच दिवसांमध्ये पुणे लोहगाव विमानतळ बदलून ते आता नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.तसेच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन तसा प्रस्ताव केंद्र सरकार कडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.असे देखील फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.