पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत युट्यूब चॅनल आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.दरम्यान सदरचे चॅनल हे शुक्रवारी हॅक झाले होते.दरम्यान आम्ही हे चॅनल सुरू केले असून या माध्यमातून थेट प्रसारणही केले जात आहे.असे या बाबत स्पष्टीकरण आज सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहे.दरम्यान सदरचे चॅनल हे हॅक करण्यात आले होते.तसेच या चॅनलचे नाव बदलून या वरुन क्रिप्टोकरन्सीचा प्रचार केला जात होता.दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने सुनावणीचे सर्व व्हिडिओ यातून हटवण्यात आले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.