Home Breaking News आज पुणे.सोलापूर.लातूर.परभणी व जालना जिल्हा बंदची हाक, आरक्षण साठी मराठा समाज आक्रमक...

आज पुणे.सोलापूर.लातूर.परभणी व जालना जिल्हा बंदची हाक, आरक्षण साठी मराठा समाज आक्रमक पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत‌ दाखल

114
0

पुणे दिनांक २२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.तसेच सगेसोयरेचा अध्यादेश व हैद्राबाद.बाॅम्बे.सातारा.गॅझेटची तातडीने लागू करण्यात यावे.तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलंकावर दाखल झालेले गुन्हे देखील तात्काळ मागे घेण्यात यावे.या मागण्यासाठी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत मागील सहा दिवसांपासून उपोषण करीत असून त्यांची प्रकृती आता खालवत चालली आहे.त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला आहे.असून या महायुतीच्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज रविवारी सकाळपासूनच महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

दरम्यान आज मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने पुणे.सोलापूर.परभणी.लातूर व जालना जिल्ह्यात  बंद ची हाक देण्यात आली आहे.दरम्यान या बंदला पाचही जिल्ह्यात सकाळपासूनच नागरिकांच्या वतीने प्रतिसाद मिळाला आहे.तसेच बहुसंख्य मराठा समाजाच्या वतीने बांधवांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान काल शनिवारी पुण्यातून मराठा समाजाचे हजारों बांधव हे कालच मुंबईला पोहोचले आहेत.ते आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा करुन त्वरित मार्ग काढावा तसेच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.त्यामुळे आजच्या आज यावर मार्ग काढावा अन्यथा लाखोंचे संख्येने मराठा समाजाचे आंदोलक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानला व संपूर्ण मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान आज वडीगोद्री येथे देखील पोलिसांच्या वतीने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वडीगोद्री ते अंतरवाली सराटी कडे जाणारा मुख्य रस्ता बंद केला असून अंतरवाली सराटीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलिसांनी 👮 मराठा समाजाच्या आंदोलना आवाहन केले आहे.

Previous articleसर्वोच्च न्यायालयाचे चॅनल पुन्हा सुरू
Next articleमराठा आरक्षण मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, महायुतीचे सरकार अजून किती मराठा युवकांचे बळी घेणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here