पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी यातील हल्लेखोरांना मध्यप्रदेश मधून पिस्तुले आणण्यासाठी मदत करणारा एकाला पुणे पोलिसांनी 👮 अटक केली आहे.त्याला पोलिसांनी बुधवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांनी १ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (रा.लक्ष्मी गार्डन सोसायटी शिवणे पुणे) असे आहे.अभिषेक यांच्या अटकेनंतर आता आंदेकर यांच्या अटकेत एकूण आरोपींची संख्या ही तब्बल २१ झाली आहे.तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.वनराज आंदेकर खूनप्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर यांनी समर्थ पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.दरम्यान माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून टोळीच्या वादातून झाला आहे.त्याकरीता वापरण्यात आलेली पिस्तुले ही मध्यप्रदेश मधून आणण्यासाठी अटक करण्यात आलेला आरोपी अभिषेक खोंड याने यातील अटक आरोपी आकाश म्हस्के.समीर काळे.आणि विवेक कदम यांना मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.दरम्यान वनराज आंदेकर यांचा खून झाल्यानंतर अभिषेक खोंड हा फरार झाला होता. दरम्यान तो फरार असताना या कालावधीत त्याला कोणी आश्रय दिला तसेच त्याला आर्थिक मदत कोणी केली.तसेच त्यांने यापूर्वी आणखी काही पिस्तुले आणली आहेत का ,आणली असली तर त्याची विक्री कोणा कोणाला केली.या सर्व बाबींचा तपास करायचा आहे.त्यासाठी पोलिसांच्या वतीने सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील विलास पठारे व तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात केली.यावर न्यायालयाने ती मान्य करत आरोपी अभिषेक खोंड याला १ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.