पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज पासून कर्नाटक सरकारने सीबीआयला यापूर्वी दिलेली राज्यात चौकशी करण्यासाठी दिलेली सहमती परत घेतली आहे.आजपासून या केंद्रीय तपास यंत्रणेला कर्नाटक राज्यात चौकशी करण्याआधी राज्य सरकार ची परवानगी घ्यावी लागणार आहे.परवाणगी नंतरच त्यांना राज्यातील कोणत्याही प्रकाणात सीबीआयला चौकशी करता येणार आहे.दरम्यान कर्नाटकचे मंत्री एच.के.पाटील यांनी ते पक्षपाती असल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगितले.याआधी काही राज्यांनी असा निर्णय घेतला होता.असे देखील ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.