पुणे दिनांक १ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथे शेयर मार्केटमधून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची तब्बल १ कोटी ९४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करणात आली आहे.दरम्यान सदर फसवणूक प्रकरणी संबंधित युवकाने सायबर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.दरम्यान या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार सायबर ठगाने संबंधित युवकाला फोन करून आपण एसबीआय सिक्युरिटीज स्टाॅक कंपनीचा आपण एंजट आहे .असं सांगितलं व या युवकाला एक लिंक पाठवत ते अॅप डाउनलोड करायला सांगितले.व आयपीओ आणि शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करायला लावली .व त्याद्वारे संबंधित युवकाला तब्बल १ कोटी ९४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.या फसवणूक प्रकरणी पुढील तपास सायबर शाखेचे पोलिस करीत आहेत.