Home Breaking News मंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकजण अटकेत

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकजण अटकेत

81
0

पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना एका अज्ञात व्यक्तीने मेसेज व फोन करुन सदरची धमकी दिली आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ यांना सतत जीवे ठार मारण्याच्या धमकी वारंवार मिळत आहे.या पूर्वी देखील त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.दरम्यान या धमकी प्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविंद्र यशवंत धनक असं भुजबळ यांना धमकी देणाऱ्याचे नाव असून त्याला अंबड 👮 अटक केली आहे.अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleदौंड मध्ये दोन टेम्पोच्या मध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू
Next articleठाण्यात वेंकटरमणा चिप्स बनविणां-या कंपनीला भीषण आग 🔥.दहा सिलेंडरचा स्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here