पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच नाशिक येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.नाशिक मधील चांदवड येथील राहुड घाटात 👮 पोलिसांच्या वाहनांला भीषण अपघात झाला आहे.सदरच्या अपघातात नाशिक ग्रामीणचे एकूण १२ पोलिस कर्मचारी हे जखमी झाले आहेत त्यांना चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यात काही पोलिसांच्या डोक्याला तर काही पोलिसांच्या पायाला जबर मार लागला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांच्या बंदोबस्त करीता हे नाशिक ग्रामीणचे पोलिस जात असताना हा अपघात झाला आहे.दरम्यान हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्टपणे कळू शकलेले नाही.