पुणे दिनांक ५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.दरम्यान आज त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांच्या उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रम होणार आहेत.दरम्यान आज अनेक कार्यक्रमात विकास आणि वारसा यांचा संगम पाहायला मिळेल.दरम्यान आज शनिवारी सकाळी ११ .३० वाजता वाशिम येथील बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.व त्या नंतर शेतकरी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.दरम्यान वाशिम येथील कार्यक्रमानंतर ते ठाण्यातील विकास कार्यक्रमा मध्ये सहभागी होणार आहेत.अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिली आहे.