पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभेची निवडणूक जाहीर झाली पण महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा मात्र महायुतीत कायम आहे.आता हा तिढा दिल्ली दरबारीच सुटणार आहे.त्या मुळे महाराष्ट्रातील महायुतीचे नेतेमंडळी हे दिल्ली दरबारी डेरे दाखल झाले आहेत.शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप असे तिन्ही गटाचे महायुतीचे नेते आज दिल्लीत दाखल होऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपा बाबत म्हत्वाची बैठक होणार आहे.आज या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा तिढा सोडवला जाईल अशी अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले व आचारसंहिता देखील लागू झाली आहे.तरी महाराष्ट्रातील जागा वाटपाचे घोडं कुठं आडलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे व महायुती यांच्यातील जागा वाटपचा तिढा कायम आहे.हा तिढा सुटण्याचं प्रयत्न नेतेमंडळी करीत आहेत.आज हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी हे नेतेमंडळी आज दिल्लीत दाखल झाले असून आज महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकी जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्याश मनसेने महायुतीकडे दोन जागांची मागणी केली आहे.पण त्यांना मुंबई दक्षिणची जागा महायुतीकडून दिली जाऊ शकते.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक जागा सोडावी लागू शकते असे बोललले जात आहे.