Home Breaking News लोणावळा घाटात खासगी बसला भीषण आग 🔥, सुदैवानं ३३ प्रवासी सुखरूप

लोणावळा घाटात खासगी बसला भीषण आग 🔥, सुदैवानं ३३ प्रवासी सुखरूप

46
0

पुणे दिनांक ६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या खळबळजनक अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील लोणावळा घाटात एका खासगी बसला भीषण आग लागली आहे.दरम्यान या आगीत खासगी बस जळून खाक झाली आहे.पोलिस सूत्रांन द्वारे मिळालेल्या माहितीनुसार ही खासगी कंपनीची बस बंगळुरू वरुन जयपूरखडे जात होती.दरम्यान सदरची बस ही पुणे जिल्ह्यातील खंडाळा घाटात आली असता अचानकपणे या बसला आग लागली होती.या बसमधून एकूण ३३ प्रवासी हे प्रवास करत होते.मात्र बसला आग लागल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसच्या बाहेर काढण्यात आले आहे.हे प्रवासी सुदैवाने सुरक्षित आहे.बस दुर्घटना मध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.मात्र आगीत बस व प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे.दरम्यान लोणावळा घाटात बसला आग लागल्यानंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.व अन्य वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगाच रांगा लागल्या होत्या.

Previous articleरामराजे निंबाळकर थोरल्या पवार गटात जाणार, धाकट्या पवारांना धक्का
Next articleशिवसेना मंत्री अब्दुल सत्तारांनी केलेल्या साड्या वाटपाची संतप्त महिलांनी केली होळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here