पुणे दिनांक ६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळ जनक अपडेट सिल्लोड येथून हाती आली असून.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे व मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड सोयगाव या मतदार संघात महिलांना साड्या वाटप केले होत्या. मात्र यात काही महिला संतप्त झाल्या व त्यांनी चक्क वाटप करण्यात आलेल्या साड्याची होळी केली आहे.दरम्यान यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.दरम्यान संतप्त झालेल्या महिलांनी सर्व साड्या एकत्र जमा करून वांगी बुद्रुक गावात या महिलांनी साड्यांची होळी केली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी काही महिलांना साड्या वाटप करताना अपशब्द वापरले होते.त्यामुळे त्यांच्या मतदार संघातील महिलांनी संतप्त होत साड्या जाळल्याची माहिती मिळत आहे.