पुणे दिनांक ७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ नेते व माजी आमदार अनंतराव थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने दिनांक ६ ऑक्टोबर रविवारी पुण्यातील भोर तालुक्यातील भोर पोलिस स्टेशन बाहेर हजारो काॅग्रेस समर्थक व कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.तसेच थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किरण दगडे पाटिल यांच्या एका कार्यकर्त्याने भोर येथील एका कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे व माजी आमदार तसेच काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंत राव थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरले.याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर भोर मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.