Home Breaking News लाडक्या बहिणींना कार्यक्रमांसाठी घेऊन जाणारी एसटी बस रायगड येथील ५० फुट दरीत...

लाडक्या बहिणींना कार्यक्रमांसाठी घेऊन जाणारी एसटी बस रायगड येथील ५० फुट दरीत कोसळली

139
0

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मोठी खळबळजनक अपडेट आली असून.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या कार्यक्रमाला महिला यांना घेऊन जाणारी एसटी बस रायगड येथील माणगाव येथील ५० फुट दरीत कोसळली आहे दरम्यान यात एकूण २९ महिला होत्या.यातील ८ महिला या गंभीर रित्या जखमी झाल्या आहेत.तर १ महिलाची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळाले ल्या माहिती नुसार रायगडमधील माणगाव रानवडे कोंड येथून महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती या कार्यक्रमाला एस टी मधून एकूण २९ महिला जात असताना बस माणगाव येथील ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला यात ८ महिला गंभीर रित्या जखमी झाल्या आहेत.तर १ महिलाची प्रकृती चिंताजनक आहे.अपघाता नंतर जखमी महिलांना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous articleआजपासून डॉक्टरांचे देशव्यापी उपोषण;५० डॉक्टरांचे राजीनामे
Next articleपुण्यात मिक्सर डंपरने कामांवर जाणाऱ्या युवतीला चिरडले घटनास्थळीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here