पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) माजी आमदार तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर बडा कब्रस्तानात शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे.त्यांचे पार्थिव आता घराबाहेर आणून मुस्लिम समाजाच्या परंपरेनुसार शेवटचे नमाज अदा करण्यात आले.व नंतर एका रुग्णवाहिकेतून ते बडा कब्रस्तानात आणण्यात आले आहे.दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तसेच नागरिक यांनी गर्दी केली आहे.दरम्यान सिद्दिकी यांच्या अंत्ययात्रेत पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच बडा कब्रस्तानात देखील मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान या भागात पाऊस सुरू आहे.मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तानात पार्थिव आणण्यात आले आहे. मित्र परिवार व नातेवाईक दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाल मानवंदना दिली आहे.त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात रात्री १० वाजता दफनविधी करण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी देखील उपस्थित होते.तसेच बाॅलीवूड मधील अनेक अनेक कलाकार मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार.मंंत्री धनंजय मुंडे.मंत्री छगन भुजबळ.प्रफुल्ल पटेल.हे सर्व मंत्री बडा कब्रस्तानात बाबा सिद्दिकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाले होते.