पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथे असून ते आज येवला येथील शिवसृष्टी येथे गेले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थक व जरांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाला त्यावेळी भुजबळ यांच्या समर्थकांनी मराठा समाजाच्या महिलां बाबत अपशब्द वापरले आहेत.त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलक हे आक्रमक झाले व त्यांनी येवल्यात आता रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे आंदोलक हे रस्त्यावर उतरले आहेत.व माफी मागितल्या शिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही.यावेळी पोलिसांनी 👮 शिवसृष्टी मध्ये भुजबळ समर्थक यांना कोंडून ठेवले आहे.भुजबळ समर्थक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे.आता पोलिस दोन्ही समाजांच्या लोकांना समजावून सांगितले जात आहे.आता पोलिसांनी आश्र्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला आहे.जवळपास तीस मिनिटे हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.त्यामुळे आता वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर कोलमडली आहे.पोलिस आता वाहतूक व्यवस्था सुरळीत करत आहेत.