पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवारी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण बैठक होत आहे.सदर ची बैठक आज सकाळीच साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.आजची मंत्रीमंडळाची बैठक ही शेवटची बैठक असू शकते.कारण १ ते २ दिवसांमध्ये कधींही राज्यात आचारसंहिता लागू शकते.दरम्यान मागील दोन आठवड्यात ही चौथी मंत्रीमंडळाची बैठक आहे.दरम्यान आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत काय निर्णय घेतले जातात थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दरम्यान मराठा आरक्षण तसेच धनगर आरक्षण या बाबत महायुती सरकार काय निर्णय घेणार का ? आजच्या कॅबिनेटच्या बैठकीवर सर्वांचेच लक्ष लागले आहे.दरम्यान आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीचा सपाटाच लावला आहे.यापूर्वी घेतलेल्या बैठकीतील निर्णयावर राज्यपाल यांच्या स्वाक्षरी होणं देखील गरजेचे आहे.येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते.