पुणे दिनांक २१ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सर्वत्र लागू करण्यात आल्यामुळे आनंदाचा शिधावाटप आता दोन महिने बंद राहणार आहे.आचारसंहितेमुळे शिधा वाटपास प्रतिबंध करण्यात आला आहे.दरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक ७ जूनपर्यंत लाभार्थ्यांना आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
दरम्यान राज्य सरकारच्या वतीने होळी.व गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आनंदाचा शिधावाटप करण्यात येणार होते.परंतू आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्यामुळे आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे.ऐन सणासुदीला आता आनंदाचा शिधा सर्व सामान्य नागरिकांना मिळणार नाही.