पुणे दिनांक १५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज मंगळवारी महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महायुतीचे सरकार आज राज्यपाल नियुक्त एकूण ७ आमदारांची नियुक्ती करणार आहे.याची यादी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना कालच देण्यात आली आहेत.राज्यपाल यांनी तातडीने लगेच याला मंजुरी दिली असून.आज दुपारी १२ वाजता या ७ जणांचा शपथविधी होणार आहे.मात्र आता याला उध्दव ठाकरे गटाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयात हे प्रकरण असून तसेच या बाबत निकाल येणे बाकी आहे.असं ठाकरे गटाचे म्हणणं आहे.दरम्यान या प्रकरणी आता आज ठाकरे गटाच्या वतीने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.