Home Breaking News माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याचा प्लॅन पुण्यातच ठरला, चौथ्या आरोपीची पुण्यात...

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याचा प्लॅन पुण्यातच ठरला, चौथ्या आरोपीची पुण्यात अटक

77
0

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज) महाराष्ट्राराज्याचे माजी  राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याचा प्लॅन हा पुण्यातच रचला असल्याचे आता हे सिध्द होत आहे.दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी आज पुण्यातून दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 मुसक्या आवळल्या आहेत,या आरोपीचे नाव हरीशकुमार बालाराम असल्याचे समजते आहे. दरम्यान हरिशकुमार हा पुण्यातील मोठा एक स्क्रॅप डीलर आहे.त्यांने हत्याच्या कटात पैसा 💸 पुरवला व तसेच इतर सहकार्य केल्याच्या संशयावरून आज त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी आमदार व राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या नंतर सलग दोन दिवसांमध्ये प्रवीण लोणकर नंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 ही पुण्यातून दुसरी अटक केली आहे.आता या सिद्दिकी यांच्या खूनातील ही चौथी अटक आहे.यातील या पूर्वी अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे एका भंगार दुकानात काम करत होते .यात पुण्यातील वारजे येथील एका  भंगार दुकानात काम करत होते.तसेच हे भंगार दुकान फरार आरोपी  लोणकर याच्या दुकाना शेजारीच भंगराचे दुकान आहे.व हरिष कुमार  हा पुण्यातील एक मोठा स्क्रॅप डिलर आहे. तसेच लोणकर व हरिष कुमार यांनी हा सगळा कट रचला तसेच हरिष कुमार यांनेच यातील आरोपींना पैशासह इतर गोष्टी पुरवल्या असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसा ना आहे.दरम्यान प्रवीण लोणकरला अटक केल्यानंतर आज पुण्यातून हरिष कुमार याच्या मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.याचा अर्थ असाच आहे की  बाबा सिद्दिकी यांच्या खूनाचा प्लॅन हा पुण्यात आखला आहे.

Previous articleआज दुपारी ७ जणांचा राज्यपाल नियुक्त आमदार घेणार शपथ? ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव
Next articleमहाराष्ट्रात पुणेसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here