Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विधानसभा जागावाटपात केली कोंडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विधानसभा जागावाटपात केली कोंडी

67
0

पुणे दिनांक १६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.राज्यात महायुतीचे सरकार होते.आज पासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.दरम्यान आता महायुतीत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान शिवसेनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्वाने चांगलीच कोंडी केली आहे.

दरम्यान शिवसेनाला जागा वाटप करताना आता केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलीच आठवण करून दिली आहे.तुम्हाला मुख्यमंत्रीपद देताना आमच्याकडे आमदारांचे संख्याबळ जास्त असताना देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे.तसेच आता तुम्ही देखील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात भारतीय जनता पार्टीला झुकते माप देऊन त्याग करावा असे सांगून अमित शाहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवण करून दिली आहे.त्यामुळे आता शिंदे चांगलेच अडचणीत आले आहेत.दरम्यान जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे.आज सकाळी ११ वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार असून यात जागा वाटपाची घोषणा होऊ शकते.

Previous articleमहाराष्ट्रात पुणेसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट
Next articleरुपाली विरुद्ध रुपाली पुण्यात पक्षांतर्गत वाद , अजित दादांच्या डोक्याला ताप?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here