पुणे दिनांक १६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक राजकीय वर्तुळातून पुण्यातून अपडेट हाती आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात पक्षांतर्गत चांगलाच वाद उफाळून आला आहे.दरम्यान अजित पवार यांच्या गटातील पुण्यातील खडकवासला न-हे येथील महिला नेत्या रुपाली चाकणकर यांची काल महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पून्हा एकदा सलग दुसऱ्यांदा महिला आयोगाच्या अध्यक्षा पदी वर्णी लागली आहे.त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील पुण्यातील दुसऱ्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे ह्या आज चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान चाकणकर यांच्याकडून राज्यातील महिला प्रदेशाध्यक्ष हे पद काढून घेण्याची मागणी रुपाली ठोंबरे यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.दरम्यान एक व्यक्ती एक पद यानुसार पक्षातील अन्य महिला तसेच इतर व्यक्तींचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचार करावा.असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांचे म्हणणे आहे.तसेच एकंदरीत पाहता रुपाली ठोंबरे यांची मागणी देखील रास्ता आहे. दरम्यान आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील निष्ठावंत कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक दीपक मानकर हे देखील पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. दरम्यान दीपक भाऊ मानकर यांची पुण्यातून राज्यपाल नियुक्त आमदारपदी नियुक्ती व्हावी अशी पुण्यातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी होती पण त्यांची वर्णी न लागल्याने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते हे नाराज असून यातील एकूण ६०० राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान या सर्व घडामोडींवर अजित पवार यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचे एकंदरीत म्हणनं आहे.