Home Breaking News मनोज जरांगे पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरुंची भेट

मनोज जरांगे पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरुंची भेट

48
0

पुणे दिनांक २० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजांचे आंदोलक व नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल शनिवारी मध्यरात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लाॅ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची भेट घेतली आहे. दरम्यान यावेळी दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली आहे.दरम्यान यापूर्वी संभाजीनगर येथील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अंतरवली सराटीत जाऊन मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.दरम्यान आज  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे दिनांक २० ऑक्टोबर रोजी मोठा निर्णय घेणार आहेत.तसेच यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मराठा समाजाच्या नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.दरम्यान काल जरांगे पाटील यांनी संभाजीनगर मध्ये मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतल्यानंतर या भेटीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान गोरं गरीबांना न्याय देण्यासाठी माणुसकी जिवंत ठेऊन एकत्र यायला हवे.अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी भेटीनंतर दिली आहे.

Previous articleमतदानापूर्वीच आटपाडीत ५०० रुपयांच्या नोटा चक्क ओढ्याच्या पाण्यात आल्या वाहून
Next articleलाॅरेन्स बिश्नोईच्या नावाखाली पुण्यात १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here