पुणे दिनांक २० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक इंटरनॅशनल गुन्हेगारी विश्ववा मधून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. पुण्यातील एका मोठ्या सराफ व्यापा-याकडे मोठा डाॅन लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाखाली चक्क १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. दरम्यान पुण्यातील सराफ व्यापा-याला ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.दरम्यान सदर खंडणी प्रकरणी सराफ व्यापा-यांने पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार दाखल केली आहे.संबंधित तक्रार दाखल होताच आता पुणे सायबर पोलिसांनी 👮 तातडीने या प्रकरणांच्या तपासाला सुरुवात केली आहे.दरम्यान मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याची जबाबदारी घेतल्यानंतर लाॅरेन्स बिश्नोई गॅंग महाराष्ट्रात चांगलीच चर्चेत आहे.