Home Breaking News तोतया पोलिसांनी पुण्यातील दोन जेष्ठ नागरिकांची ७० लाख रुपयांची ऑनलाइन केली फसवणूक

तोतया पोलिसांनी पुण्यातील दोन जेष्ठ नागरिकांची ७० लाख रुपयांची ऑनलाइन केली फसवणूक

147
0

पुणे दिनांक २४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुण्यातील दोन जेष्ठ नागरिकांना चुना लावल्याची घटना घडली आहे.सदर घटनेत सायबर चोरट्यांने आपण पोलिस असल्याचे सांगून पुण्यातील पाषाण व सदाशिव पेठेतील दोन जेष्ठ नागरिकांच्या बॅंक खात्यातून तब्बल ७० लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केली आहे.दरम्यान ही घटना दिनांक २२ ऑक्टोबरला उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी एका जेष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुणे शहरात सायबर चोरट्यांने आता जेष्ठ नागरिकांना हेरुन तसेच त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनेत पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.सदर घटना पाषाण परिसरात असीच घटना घडली आहे.या भागातील जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांने त्यांच्या मोबाईलवर एक संदेश पाठवला व त्यांना पोलिस दलातील बनावट ओळखपत्र पाठवले.तसेच तुमच्या बॅंक खात्यात काळ्या पैशाचे गैरव्यवहार झाले आहे. या करीता गुन्हा दाखल न करण्यासाठी पैसे जमा करावे लागतील असे सांगितले.त्यानंतर चोरट्यांनी  त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातून ४५ लाख रुपये परस्पर काढले.तर दुसरी अशाच प्रकारची घटना ही सदाशिव पेठेतील टिळक रोडवर घडली आहे.यात जेष्ठ ८४ वर्षीय नागरिकाच्या मोबाईलवर  सायबर चोरट्यांने संपर्क साधला.व त्यांना सांगितले की तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करण्यात आला आहे.अशी त्यांना भीती घालून चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यातून २५ लाख ४० हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली आहे.दरम्यान या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी पर्वती पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात सायबर चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Next articleअजित पवार यांच्या राष्ट्रवादीत झिशान सिद्दीकीचा पक्ष प्रवेश.७ जणांची उमेदवारी जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here