पुणे दिनांक २५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात सर्वत्र विधानसभेची धामधूम सुरू आहे.दरम्यान राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मध्ये महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ व भारतीय जनता पार्टीतून शरद पवार गटात पक्षप्रवेश केलेले समरजित घाडगे या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.यावेळी दोन्ही गटातील महाविकास आघाडीचे व महायुतीचे कार्यकर्ते हे कागल येथे समोरा समोर येऊन अपसात भिडले आहेत.यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते यांनी एकमेकां वर दगडफेक देखील केली आहे.यानंतर कागलमध्ये चांगलाच राजकीय हायहोल्टेज सामना रंगला होता. दरम्यान पोलिसांनी यावेळी तातडीने हास्तक्षेप करुन दोन्ही गटातील कार्यकर्ते यांना शांत केले आहे.