Home Breaking News पुण्यातील शुक्रवार पेठेत मटका अड्ड्यावर छापा,नंदू नाईकसह ६० जण गजाआड गुन्हे शाखेची...

पुण्यातील शुक्रवार पेठेत मटका अड्ड्यावर छापा,नंदू नाईकसह ६० जण गजाआड गुन्हे शाखेची कारवाई

136
0

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने शुक्रवार पेठेतील खडक पोलिस पोलिस स्टेशनच्या हद्दीत काल मध्यरात्रीच्या सुमारास जनसेवा भोजनालय येथील दुसऱ्या मजल्यावर छापेमारी करून नंदू नाईक यांच्यासह ६० जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ४७ मोबाईल आणि एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली आहे.दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील सर्व अवैध धंद्यांवर चांगलेच नियंत्रण आले आहे.परंतु  यातील काहीजण चोरुन अवैध धंदे चालवत असल्याचे समोर आले आहे.दरम्यान पुण्यातील शुक्रवार पेठेत  खडकपोलिस स्टेशनच्या हद्दीत नंदू नाईक मटका जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने सदरच्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई केली आहे.सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार.सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा.अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे.पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे.सहा.  पोलिस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे.सहा.पोलिस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक.यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथक १ व २ खंडणी विरोधी पथक १  तसेच दरोडा व वाहन चोरी पथक १ युनिट १ व ५ यांनी सदरची कारवाई केली आहे.

Previous articleभाजपच्या नेत्याची जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह टीका,धांदरफळ गावात काॅग्रेस कार्यकर्ते आक्रमक गाड्यांची तोडफोड व जाळपोळ
Next articleजयश्री थोरात रात्रभर पोलिस स्टेशन बाहेर, अखेर वादग्रस्त विधानाबद्दल वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here