पुणे दिनांक २६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता मुंबईतील हत्याकांडातील एक मोठी अपडेट हाती आली असून.मुंबतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या ही १२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यात दोन शूटर्ससह आता प्रर्यत एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्याण आता या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानचे कनेक्शन समोर आले आहे. पाकिस्तान मधून भारतात ड्रोनच्या सहाय्याने ही शस्त्र पाठविण्यात आली होती.यात तीन विदेशी तर एक देशी पिस्तूलचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.