पुणे दिनांक २८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने त्यांचे नातू युगेंद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी जेष्ठ नेते शरद पवार व बारामतीच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे.तसेच युगेंद्र पवार यांचे आई वडील व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान आता बारामती मधून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.तर आज बारामती मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.