Home Breaking News दौंड विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर

दौंड विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर

91
0

पुणे दिनांक २८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातून रमेश किसन थोरात यांना आता काही वेळापूर्वीच  जेष्ठ नेते शरद पवार यांनी अधिकृत उमेदवार नाव घोषित केले आहे. रमेश थोरात हे तुतारीवर निवडणूक लढविणार आहेत.तर रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दौंड येथील शरद पवार गटाचे आप्पासाहेब पवार हे नाराज झाले असून ते आता कार्यकर्ते यांच्या बरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान आता दौंड येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे रमेश थोरात यांच्यात मुख्य लढत होणार आहे.मागील विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात हे थोड्या मतांनी पराभूत झाले होते.मागील काही दिवसांपूर्वी ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले होते.व पुन्हा त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात सहभागी होऊन उमेदवारीची मागणी केली होती.त्यांना आज शरद पवार गटाकडून दौंड विधान सभा निवडणुकी साठी उमेदवारी मिळाली आहे.

Previous articleयुगेंद्र पवारांनी आज बारामती मधून उमेदवारी अर्ज दाखल केला
Next articleविधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here