पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.विधानसभा निवडणूकीतून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे.दरम्यान मित्र पक्षांकडून उमेदवारांची यादी आली नाही तसेच एका जातिवर निवडणूक लढविणे अशक्य आहे.तसेच माझ्यावर कोणत्याही राजकीय पक्षांचा दबाव नाही. दरम्यान ही माघार नसून हा एक गनिमी कावा आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला व अपक्ष आमदार यांना आमचा पाठिंबा नाही.तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करा.तसेच याला पाडा त्याला पाडा असं मी म्हणणार नाही.तुम्हाला ज्यांना मतदान करायचे त्याला करा.दरम्यान आंदोलनामध्ये हजार पाचशे लोक असलेतरी चालून जाते.राजकरणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते.असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी म्हटले आहे.