पुणे दिनांक ६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राज्यातील बंडखोरी बाबत एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच वेग आला आहे.अशातच राज्यात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणां-या उमेदवारा विरोधात आता पक्षाच्या वतीने कठोर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.अशातच भारतीय जनता पार्टीने राज्यातील वेगवेगळ्या एकूण ३७ विधानसभा मतदारसंघातून ४० जणांची पक्षामधून हकालपट्टी केली आहे.यात कार्यकर्ते तसेच पक्षाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.दरम्यान यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी पक्षाचा आदेश न पाळल्याने तसेच पक्ष शिस्त न पाळल्याबद्दल त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.यामुळे एकच राजकारण खळबळ उडाली आहे.दरम्यान या मधील बंडखोर आमदार म्हणून निवडून आल्या नंतर त्याला पक्षात घेणार का ? या बाबत कोणत्याही राजकीय पक्षाने या बाबत स्पष्टीकरण दिले नाही.