Home Breaking News अजित पवारांनी पुण्यातील बंडखोर नेत्याची केली हकालपट्टी

अजित पवारांनी पुण्यातील बंडखोर नेत्याची केली हकालपट्टी

50
0

पुणे दिनांक ७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता पुण्यातून एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.कोथरुड विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर नेते विजय डाकले यांनी बंडखोरी केली आहे.त्यामुळे अजित पवार यांनी विजय डाकले यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी रितसर डिकले यांच्या हकालपट्टीचे पत्रक जारी केले आहे.दरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यात विधानसभा निवडणुकीत महायुती आहे.पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीत कडून भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत.दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणां-या ४० जणांवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने रितसर कारवाई केलेली आहे.

Previous article‘ मतदान करा, पाडापाडी करायाचीच आहे ‘ मनोज जरांगे पाटील
Next articleपीएम विद्यालक्ष्मी योजना मंजूर; विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार १० लाखांचे कर्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here