Home Breaking News पुणे जिल्ह्यातील उमेदवाराच्या मुलाचे १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण एकच खळबळ

पुणे जिल्ह्यातील उमेदवाराच्या मुलाचे १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण एकच खळबळ

48
0

पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता पुणे जिल्ह्यातून एक राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून त्यांना खंडणी साठी बेदम मारहाण करण्यात आली आहे‌ अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान या प्रकरणी शिरूर तालुका पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज पवार यांचे शिरुन तालुक्यातील मांडवगण  फराटा येथून अपहरण केले व त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या सुटकेसाठी १० कोटी रुपयांची खंडणी मांगण्यात आली आहे.तसेच ऋषीराज याला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणानंतर पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

 

Previous article‘लोकसभेला दणका दिल्यानंतरच लाडक्या बहिणी झाल्या ‘ खासदार सुप्रिया सुळे
Next articleमुंबई जवळील कसा-याजवळ नंदीग्राम धावत्या रेल्वे एक्स्प्रेसला भीषण आग 🔥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here