पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.महायुती सरकार ने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आणि याच योजना बद्दल महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका केल्यानंतर लाडक्या बहिणी बद्दल अपशब्द वापरणा-या महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो,माझे वक्तव्य कोणत्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते .मला फक्त लाडकी बहीण योजना महायुती सरकारने यशस्वीपणे राबविली हे नमूद करावयाचे होते.असे आता स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.