Home Breaking News मला गृहमंत्री केले तर सत्तेतील ७० टक्के लोक गुवाहाटीला पळतील – आमदार...

मला गृहमंत्री केले तर सत्तेतील ७० टक्के लोक गुवाहाटीला पळतील – आमदार रोहित पवार

34
0

पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून ‌, विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मला गृहमंत्री केले तर सत्तेतील ७० टक्के लोक गुवाहाटीला पळतील,असा टोलाच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.दरम्यान पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.आम्ही कुणाला सोडत नाही.घाबरत देखील नाही, आम्ही घाबरलो असतो तर आम्ही देखील पळून गेलो असतो.आम्ही लढणारी माणसं आहोत.आम्ही दिल्ली समोर कधी झुकत नाही.असे देखील प्रचार सभेत बोलताना आमदार रोहित पवार हे म्हणाले आहेत.

Previous articleमराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद
Next articleसंभाजीनगर मध्ये भीषण आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here