पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच संभाजीनगर येथून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्रीत प्लास्टिकच्या दुकानाला आग लागून तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.दरम्यान या आगीच्या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगीत होरपळून मृत्यू झालेल्या तीन जणांची नावे १) नितीन नागरे २) सलिम शेख ३) गजानन वाघ .अशी आहेत.तर अन्य दोन जण गंभीर रित्या जखमी आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या प्लास्टिकच्या दुकानाला शाॅकसर्कीट मुळे आग लागल्याबाबत माहिती मिळत आहे.ही आग रात्री एक वाजण्याच्या सुमारास लागली आहे.