Home Breaking News झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील ४३ जागांवर मतदानाला सुरुवात

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील ४३ जागांवर मतदानाला सुरुवात

38
0

पुणे दिनांक १३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज बुधवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे.दरम्यान झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण जागा ८१ आहेत.त्यापैकी यातील ४३ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. राहिलेला उर्वरित जागांवर २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.याच दरम्यान देशातील जवळपास १० राज्यातील ३१ विधानसभा मतदारसंघात आज पोट निवडणूक होत आहे.तसेच केरळ मधील वायनाड  लोकसभा मतदारसंघात देखील पोटनिवडणूक होत आहे.दरम्यान आज याठिकाणी सर्वत्र सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान झारखंड ४३ विधानसभा मतदारसंघात आज मतदारांना मतदान करता येणार आहे.दरम्यान झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.यात प्रामुख्याने सरायाकेला मधून माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते चंपाई सोरेन.जमशेदपूर (पूर्व) मतदार संघातून माजी मुख्यमंत्री रघूवीर दास यांच्या सूनबाई पोर्णिमा दास साहू.तर रांचीतून महुआ माजी या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.दरम्यान आज होणा-या मतदानानंतर मतमोजणी ही २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

Previous article‘फसवेगिरीच्या सर्व मर्यादा छगन भुजबळ यांनी ओलांडल्या ‘ – जेष्ठ नेते शरद पवार
Next articleभारत & आफ्रिका आज तिसरा टी -२० सामना आज सेन्च्युरियनच्या मैदानावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here