पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथून एक अपडेट हाती आली असून.कोल्हापूर मधील इचलकरंजीत आज जेष्ठ नेते शरद पवार यांनी भर पावसात सभा गाजवली आहे.दरम्यान इचलकरंजी येथे जेष्ठ नेते शरद पवार यांची सभा सुरू होताच अचानकपणे पावसाला सुरुवात झाली . दरम्यान पाऊस सुरू असताना देखील शरद पवार यांनी जोरदार भाषण केले.यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि सभेला आलेल्या असंख्य नागरिकांनीही जल्लोष करत शरद पवार यांना उत्तम अशी साथ दिली.दरम्यान या पूर्वीच्या निवडणूकीत देखील साता-यात जेष्ठ नेते शरद पवार यांनी भर पावसात सभा गाजवली होती.त्यामुळे संपूर्ण राज्यात निवडणूकीत वातावरण बदलून यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला होता.तेव्हा निशाणी घड्याळ होते.पण आताच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह हे तुतारी आहे.