पुणे दिनांक १६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.बारामतीत एका व्यक्तीने विरोधात काही अपशब्द वापरले आहेत.त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही.अशा पद्धतीने वैयक्तिक टिपणी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्या वर केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान बारामतीमधील दोघांनी व्हिडिओच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावर मानहानीकारक अपशब्द वापरले होते.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामती मधील दोन अज्ञात व्यक्तीने मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.दरम्यान दिलिप शिंदे व संतोष सातव यांनी व्हिडिओ चित्रीकरणाद्रारे जरांगे पाटील यांच्या बद्दल मानहानी कारक शब्द वापरले.या घटनेनंतर मराठा बांधवांनी या व्हिडिओ प्रकरणी निषेध केला आहे.आणि पोलिस स्टेशन मध्ये तक्रारीचे निवेदन दिले दिले आहे.तसेच या दोघांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.