पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथील कसबा विधानसभा मतदारसंघांत प्रचारफेरी दरम्यान अपक्ष उमेदवाराची किटली व पंजा यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली आहे.दरम्यान बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे व काॅग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर प्रचंड प्रमाणावर घोषणा बाजी करण्यात आली आहे.
दरम्यान आता विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगत वाढली आहे .काॅग्रेस पक्षाच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे.यांच्या प्रचारार्थ रविवारी कसब्यात दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती.यावेळी दोन्ही बाजूंचे उमेदवार व कार्यकर्ते अचानकपणे एकमेकांसमोर आले.व दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये टशन पाहायला मिळाली.सदरचा राडा हा शिवाजी रोडवर झाला आहे.