पुणे दिनांक २१ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उद्योग क्षेत्रातून खळबळ जनक अपडेट आली असून.अमेरीका मधील न्यूयॉर्क च्या फेडरल न्यायालयाने उद्योगपती गौतम अदानींसह एकूण ७ जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप केला आहे.याच बरोबर उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.दरम्यान भारतात सैरऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळविण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिका-यांना 250 दशलक्ष लाच देण्याचे आश्र्वासन दिले होते.दरम्यान लाचेचे पैसे गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकेन,परदेशी गुंतवणूकदार आणि बॅकांशी खोटे बोलले.असा आरोप आहे.