पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून.विधानसभेचा निकाल हा दिनांक २३ नोव्हेंबर रोजी लागणार असून मात्र त्यापूर्वीच पुणे येथे अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.दरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात संतोष नांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत.दरम्यान लावण्यात आलेल्या बॅनर वर मुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल शुभेच्छा,असा मजकूर लिहिण्यात आला आहे.त्यामुळे या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी अजित पवार हे किंगमेकरच्या भूमिकेत येतील आणि मुख्यमंत्री होतील.असे पहिल्या पासूनच सांगत आले आहेत.त्यामुळे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.निकाल लागयला आता फक्त २४ घंटेच उरले आहेत.उद्या शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.