Home Breaking News भारतीय जनता पार्टीच्या एक्झिट पोलमध्ये मविआला फक्त १०० जागा

भारतीय जनता पार्टीच्या एक्झिट पोलमध्ये मविआला फक्त १०० जागा

36
0

पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती असून.दरम्यान उद्या शनिवारी विधानसभा निवडणुकीचा २८८ जागेचे निकाल सकाळी येण्यास सुरुवात होईल.दरम्यान  महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार आणि कुणाचा पत्ता कट होणार निकालापूर्वीच या संदर्भात वेगवेगळे अंदाज बांधणारे एक्झिट पोल समोर येत आहेत. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील बुथ लेव्हलवरुन माहिती गोळा केली आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या या एक्झिट पोल नुसार महायुतीला राज्यात एकूण १६४ जागा मिळतील तर  महाविकास आघाडीला  फक्त १०० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तर महायुतीत  भारतीय जनता पार्टीला १०० व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ जागा मिळतील असे या एक्झिट पोल मध्ये सांगण्यात आले आहे.दरम्यान हा एक अंदाज आहे.परंतू खरं चित्र उद्या शनिवारीच स्पष्ट होणार आहे.

Previous articleपुण्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर
Next articleIND vs AVS – भारताने टेस्ट मालिकेत टाॅस जिंकला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here