पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.काॅग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.दरम्यान नसीम खान यांच्या कार्यालयांमध्ये दोन संशयित आढळून आले होते.तसेच या संशयितांच्या मोबाईल मध्ये नसीम खान यांच्या संबंधीत आक्षेपार्ह चॅटही आढळून आले होते.दरम्यान विजयादशमीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.आता याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी 👮 काॅग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांच्या घरा बाहेर व कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.