पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उद्या शनिवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.दरम्यान सुरुवातीला पोस्टल बॅलेटचे काऊंटींग सुरू होईल तर अर्ध्या तासांनी ईव्हीएमच्या काऊंटींगला सुरुवात होईल.त्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान काऊंटींग ऑब्जर्वर राहणार आहेत.दरम्यान संपूर्ण मतमोजणी केंद्रावर प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगाराणीखाली होईल.अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणी केंद्रावर सुरू होणार आहे.तसेच निकाल देखील उद्या येणार आहे.त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मतमोजणी केंद्रावर एकूण ६ हजार ५०० टीम व तेवढेच टेबल मतमोजणी साठी राहणार आहेत. तसेच ४ हजारच्या आसपास ईव्हीएम काऊंटींगच्या टीम आणि टेबल्स राहणार आहेत.२ हजार ५०० च्या आसपास पोस्टल बॅलेटच्या काऊंटिंगसाठी टीम तयार रहाणार आहे.दरम्यान सकाळी सहा वाजल्यापासून ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेट उमेदवारांच्या समोर व्हिडिओग्राफी करुन ईव्हीएम मशिनचे सील उघडणार आहे.अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे.