पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील वेस्ट बांद्रा येथील ताज लॅंडस् एंड हाॅटेलमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांची महत्त्वपुर्ण बैठक सुरू आहे.सदरच्या बैठकीत शिवसेना आमदार उदय सामंत यांनी यावेळी ठराव मांडला की शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी नेमण्यात यावे.यावेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने एकनाथ शिंदे यांची यावेळी शिवसेना गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली आहे.