पुणे दिनांक २५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून.आदित्य ठाकरेंची उध्दव ठाकरे गटाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.तर विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.तसेच सुनील प्रभू यांची उध्दव ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे.आज विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली.यावेळी सर्व आमदारांची बैठक झाली.यावेळी सर्व २० आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.